प्रा.अनिल जी होळी यांनी युवावर्गाला उद्देशून सांगितले की, "गोंडी भाषा व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे...!


 ⚔️आदिवासींवरील अन्याय थांबवण्यासाठी समाज एकत्र येणे गरजेचे


🖋️ _"युवावर्गाने गोंडी संस्कृती टिकवण्यासाठी पुढाकार घ्यावा – प्रा. अनिल होळी"_

      

मोहगाव (सोनसरी), ता. कुरखेडा (जि. गडचिरोली) – येथे बिरसा मुंडा आणि राणी दुर्गावती यांच्या पुतळ्यांचे अनावरण तसेच गोंडी धर्म संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रसंगी वक्ते म्हणून प्रा. अनिल होळी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गोंडी भाषा, संस्कृती आणि आदिवासी हक्कांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण विचार मांडले.  

      

प्रा. होळी यांनी युवावर्गाला उद्देशून सांगितले की, "गोंडी भाषा व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. आजच्या पिढीने मातृभाषेचा अभिमान बाळगून तिच्या टिकावासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शिक्षण इतर भाषांमध्ये घेतले तरी आपल्या मूळ भाषेचा विसर पडता कामा नये."

   

 

 तसेच, त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय आणि शोषणाविषयी चिंता व्यक्त केली. "आपण एकत्र आलो नाही, म्हणूनच आज शोषण व अत्याचार होत आहे. आदिवासी समाजाने एकत्र येऊन अन्यायाविरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले.  


      


 यावेळी त्यांनी राज्याच्या राजकीय घडामोडींवरही भाष्य केले. महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिले मुख्यमंत्री, ज्यांनी गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वतःकडे ठेवली, याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, "ही जबाबदारी विकासासाठी नसून जिल्ह्यातील नैसर्गिक संपत्तीची लूट करण्यासाठी घेतली गेली आहे. इथला खनिजसंपत्तीचा फायदा स्थानिकांना न मिळता उद्योगपतींच्या खिशात जात आहे," असा आरोप त्यांनी केला.  

      

  

संमेलनादरम्यान आदिवासी हक्क, गोंडी धर्म, शिक्षण आणि सामाजिक एकता यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित आमदार मा.रामदासजी मसराम साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मनोहर पाटील पोरेटी साहेब, उपाध्यक्ष म्हणून मा. माधवजी गावड साहेब, प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित मा. गणेश दादा ईडपाची (बिरसा ब्रिगेड),मा. खंडाते मॅडम , मा. अनिल दादा केरामी, मोहनजी पुराम, विकीदादा गेडाम, अनेक समाजबांधव, युवा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



अश्याच प्रकारच्या ताज्या बातम्या आणि News updates साठी व शेतकरी योजना व रोजगार संदर्भात सरकारी योजने संदर्भात खाजगी व सरकारी नोकरी संदर्भात विस्तृतपणे माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या सरकारी माहिती ह्या संकेतस्थळ ला व्हिजिट करू शकता त्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून आमच्या सरकारी माहिती या Whatsapp group ला जॉईन व्हा


https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO









Post a Comment

0 Comments