"स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी नायकांचे योगदान जनतेसमोर आणणे ही आजच्या पिढीची जबाबदारी"

“It is the responsibility of today’s generation to bring before the people the contribution of tribal heroes in the freedom struggle.”

प्रा. अनिल होळी यांचे आदिवासी मुलींचे वस्तीगृह येथे मार्गदर्शन

देसाईगंज, दि. ०५ ऑक्टोबर २०२५

      आदिवासी विकास विभाग संचालित शासकीय आदिवासी मुलींचे वस्तीगृह, देसाईगंज येथे “जनजातीय गौरव दिवस पंधरवाडा” निमित्ताने “स्वातंत्र्य लढ्यात जनजातीय नायकांचे योगदान” या विषयावर प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी मुला-मुलींचे वस्तीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात होते.

     या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. अनिल होळी उपस्थित होते. आपल्या प्रभावी मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांना आदिवासी इतिहासाचा सखोल अभ्यास करण्याचे, पूर्वजांच्या बलिदानातून प्रेरणा घेण्याचे आणि शिक्षणाद्वारे समाजात परिवर्तन घडविण्याचे आवाहन केले.

     प्रा. होळी म्हणाले की, “आजची तरुण पिढी फक्त दोन दिवसांसाठी व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून ‘आदिवासी अभिमान’ दाखवते, पण आपल्या समाजातील क्रांतिकारक आणि पूर्वजांच्या संघर्षाची खरी माहिती त्यांना नाही. त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजात दिशा निर्माण करणे गरजेचे आहे.”

      त्यांनी पुढे सांगितले की “१८५७ हे पहिले स्वातंत्र्य संग्राम मानले जाते, पण सत्य हे आहे की १७६६ ते १७७१ दरम्यान तिलका मांझी यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारून क्रांतीची पहिली ठिणगी पेटवली. तेच खरे पहिले आदिवासी आणि भारतीय क्रांतिकारक होते. दुर्दैवाने, त्यांचा इतिहास दडपला गेला”

     प्रा. होळी यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की आपल्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानातून मिळालेल्या योजना, अधिकार आणि आरक्षणाचा योग्य उपयोग करून समाजाच्या विकासासाठी स्वतःला समर्पित करावे.

कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून वस्तीगृहातील गृहपाल मा. वट्टी मॅडम, प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रकाश वट्टी सर, डॉ. निलेश हलामी सर, मा. किशोर कुमरे सर, मा. गृहपाल प्रधान सर, मा. धनबाते सर, मा. सलामे सर उपस्थित होते व वस्तीगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेतले.

Post a Comment

0 Comments