"गडचिरोली जिल्ह्यातील कोंढाळा गावाची सरपंच स्वातंत्र्यदिनानिमित्त थेट दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून मीडियाशी संवाद साधताना"

 "Kondhala Village Sarpanch from Gadchiroli District Addresses Media Live from Delhi's Red Fort"


दिल्ली : 15 आगष्ट 2025 मधला सर्वात ऐतिहासिक मुलाखत 

मुलाखतीचा एक आकर्षनाचा भाग म्हणजे गडचिरोली गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त भाग आहे तर  यावरून मीडिया वाल्यानी प्रश्न विचारल तेव्हा त्याबद्दल आपल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कोंढाळा गावच्या यशस्वी सरपंच श्रीमती अपर्णा नितीन राऊत यानी सर्वप्रथम अस सांगितलं आहे की आम्ही ज्या भागात राहतो त्या भागात आम्ही खूप सेफ आणि सुरक्षित आहोत. पण महाराष्ट्राच्या बाहेर राज्यातील  लोकांच म्हणणं आहे की गडचिरोली हा नक्षलग्रस्त भाग आहे पण तसा अजूनपर्यंत तरी काहीच इथ काहीच आढळून आलं नाही असे मीडिया समोर त्यानी स्पष्ट पणे सांगितल आहे.

अश्या ऱ्याच गोष्टीचा उल्लेख त्यानी केला आहे त्यामधून महत्वाचा भाग म्हणजे युवा पिढीच्या Shadow पंचायत या संकल्पना बद्दल सांगितलं आहे shodow पंचायत या संकल्पनेतून गावातील तरुण मुलांनी नाना प्रकारचे उपक्रम राबविले आहेत जस की कबड्डी खो खो योगा क्लासेस अंगणवाडी जिल्हा परिषद या सगळ्यांना सोबत घेऊन शाळेत विविध प्रकारच्या शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आलं आहे आणि महत्वाचा म्हणजे गाव स्वच्छतेसाठी गावातील युवक वर्गानी खूप उत्तम प्रकारे काम करून गावच्या सरपंच ला एक मोलाचा सहकार्य केला आहे. 

 अस त्यानी मीडिया त्यानी मीडिया समोर म्हंटल आहे. आणि गावातील किशोर वयीन युवक युवती व गावच्या मुलांच्या बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी व अभ्यासिका,अंगणवाडी, मुलांना खेळण्यासाठी योग्य ती जागा निवडून देणं असो की मग पोलीस भरती साठी योग्य तो मार्गदर्शन प्रत्येक कामाची दखल घेत त्यानी आपल्या गावाबद्दल अतिशय निःसंकोचपणे मीडिया समोर मुलाखत देत गावाच्या विकासाबाबत त्यानी महत्त्वाच काम सांगितल आहे.

आपल्या कोंढाळा गावासाठी आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी ही खरोखरच अभिमानाची बाब आहे की केंद्र सरकारने आपल्या गडचिरोली जिल्ह्याची निवड केली आहे. कोंढाळा हे छोटंसं पण मेहनती लोकांचं गाव आहे. शेती, जंगलसंपत्ती आणि निसर्ग यांचं सुंदर मिलन इथे पाहायला मिळतं. गावकरी एकत्र राहून मेहनतीच्या बळावर आपलं उपजीविकेचं साधन टिकवून आहेत. शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता अशा क्षेत्रांत गाव हळूहळू प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. अशा गावातून सरपंच थेट दिल्लीच्या लाल किल्ल्यावर जाऊन मीडियाशी संवाद साधत आहे, ही केवळ वैयक्तिक नव्हे तर संपूर्ण गाव आणि जिल्ह्याच्या गौरवाची गोष्ट आहे.








Post a Comment

0 Comments