जिल्हा वार्षिक योजना बैठकीत आमदार रामदास मसराम सर -यांची उपस्थिती
गडचिरोली: जिल्हा वार्षिक योजना संदर्भातील महत्वपूर्ण आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. आणि या बैठकीत आमदार रामदास मसराम सर यांनी उपस्थित राहून जिल्ह्यातील विकासकामे, प्रकल्प आणि निधी वितरणासंबंधी चर्चा केली.
बैठकीत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आमदार रामदास मसराम सर यांनी जिल्ह्यातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित कामांवर विशेष भर देण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, "गडचिरोली जिल्ह्यातील विकासासाठी पुरेसा निधी मिळावा आणि तो योग्य ठिकाणी वापरला जावा, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. प्रशासनानेही योजनांची अंमलबजावणी तातडीने करावी."
बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील प्रगती अहवाल सादर केला. आगामी वर्षासाठी कोणत्या योजनांना प्राधान्य द्यायचे याबाबतही चर्चा करण्यात आली.
या बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या मतप्रदर्शनातून जिल्ह्यातील गरजा अधोरेखित केल्या. विकास कामांच्या गतीस वेग देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असा आग्रह आमदार रामदास मसराम सर यांनी धरला
सध्या आमदार मसराम सर हे आमदार झाल्यापासून धडाधड निर्णय एकामागून एक घेत आहेत. त्याबद्दल त्यांच्यावर जनता खुश आहे.
अश्याच प्रकारच्या ताज्या news Updates साठी रोजगार संदर्भात योजने संदर्भात सम्पूर्ण सरकारी नोकरी खाजगी नोकरी बाबत विस्तृतपणे माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या सरकारी माहिती या संकेतस्थळ ला व्हिजिट करु शकता...सोबतच आमच्या सरकारी Whatsapp Group ला जॉईन पण होऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO
0 Comments