आज देसाईंगंज वडसा तालुक्यातील कोंढाळा या गावी गरदेवाची पूजन दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा करण्यात आली.
आज देसाईंगंज वडसा तालुक्यातील कोंढाळा या गावी गरदेवाची पूजन दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा करण्यात आली. सोबत अफाट जत्रा भरली आजूबाजूला चैतन्यलहरी वातावरण लाखो हजारोंच्या संख्यांनी तरुण आणि प्रौढ भाविक भक्तांची गर्दी उसळली बाहेर जिकडे तिकडे आनंदाचा जणू मोहोत्सवच चालू होता.
अस म्हंटल्या जाते की ही प्रथा खूप प्राचीन काळापासून चालत आलेली आहे पण गावची मेघनाद गरदेवाची परंपरा ही जवळपास 250 वर्षे जुनी आहे जी कोंढाळा गावच्या बुराडे परिवाराने अगदी मनापासून जपून ठेवली आहे. कित्येक पिढ्या न पिढ्या या गरदेव पूजनाला हाक देण्यासाठी आपले अमूल्य योगदान दिले आहेत आणि त्यांचाच घऱ्याणाचा वारसा श्री महादेवजी बुराडे हे आतापर्यंत ही प्रथा अत्यंत चांगल्या रीतीनें चालवत आहेत.
आणि त्यासाठी 2 दिवसा अगोदर पासूनच याची तयारी केली जाते रात्रभर जागरण आणि धुलीवंदनाच्या एक दिवस अगोदर देवाला हाक देऊन त्याला होकरे या शब्द मंत्राने देवाला जागे केलं जाते याची सुरुवात सुमारे 10 वाजता पासून ते सकाळचे 4 वाजेपर्यंत देवाला हाक देऊन त्याला " होकरे'' या पवित्र शब्दाने बुराडे परिवाराच्या देवाला जागी केल्या जाते. आणि बरोबर धुलीवंदनाच्या दिवशी गरदेव स्थानाकडे जाऊन ती भव्य दिव्य पूजा केली जाते आणि
याच सामाजिक बांधलीकीतून एकात्मतेचा संदेश देणाऱ्या मेघनाद गरदेवाच्या निमित्ताने मेघनाद जत्रेच्या उत्सवाला गावातील बुराडे परिवार आणि गावातील सर्व नागरिक या गरदेव पूजनाला हजेरी लावतात आणि पाया पडून
गावातील इडा पीडा टाळण्यासाठी या देवाचा जास्त फायदा भाविक भक्तना होतो त्यामुळे ही गर देवाची रूढी परंपरा आणि संस्कृती गेल्या अनेक दशकापासून चालत आलेली ही परंपरा अजूनही मोठ्या आनंदाने आणिउत्साहाने भक्तिभावाने केल्या पूजा केली जाते.
0 Comments