"कुरखेडा तालुक्यातील आंधळी ते मालदुगी रस्त्याची आमदार रामदास मसराम यांनी केली पाहणी – दोन दिवसात खड्डे दुरुस्त करण्याचे दिले आदेश"

 "MLA Ramdas Masram inspected the Andhli to Maldungi road in Kurkheda Taluka and instructed that the potholes be repaired within two days."


तालुका कुरखेडा आंधळी ते मालदुगी मार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि अपुऱ्या दर्जाच्या कामामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, आमदार रामदास मसराम यांनी सदर रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी कन्स्ट्रक्शन साईट मॅनेजर श्री. पिणखेडे यांच्याशी आमदार मसराम यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून दोन दिवसांच्या आत रस्त्यावर पडलेले सर्व खड्डे तत्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या सुरक्षेचा आणि वाहतुकीच्या सोयीचा विचार करून या रस्त्याच्या दुरुस्तीची तातडीने गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्या वेळी सोबत : माजी जिल्हा प. उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जीवन पाटील नाट, भावेश मुंगणकर

Post a Comment

0 Comments