"After an argument with his mother over not liking okra curry, a 17-year-old boy left home and set off towards Delhi."
नागपूर | १३ जुलै २०२५
"His mother had made okra (bhindi) curry for dinner.
A disagreement broke out at home. The matter of the curry might seem minor, but for a 17-year-old boy, it became so serious that, in a fit of anger, he left his home and set off from Nagpur to Delhi, leaving his entire life behind."
आईने रात्रीच्या जेवणासाठी भेंडीची भाजी बनवली. घरात काहीसं वाद झालं. भाजीचा विषय तसा छोटा वाटावा, पण १७ वर्षांच्या एका मुलासाठी तो इतका गंभीर ठरला की त्याने रागाच्या भरात संपूर्ण घरचं आयुष्य मागे टाकलं आणि थेट नागपूरहून दिल्लीकडे प्रस्थान केलं.
गुरुवारी 10 जुलै रोजी त्याच्या आईने भेंडीची भाजी बनवली होती. त्यावरुन पुन्हा त्याने आईसोबत वाद घातला आणि तो घरातून निघून गेला. पोलिसांनी घरापासून 1,200 किमी दूर सापडला. रात्रीच्या साधारणपणे 11 वाजता घरातून निघून गेला आणि रागारागातच दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसला. जेव्हा कुटुंबीयांतील लोकांनी त्याला परिसरात शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हादेखील तो सापडला नाही. अखेर त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट आणि पोलिसांनी मिळून त्याला शोधून काढले. त्यानंतर विमानाने ते मुलाला नागपूरला घेऊन आले.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या ललिता तोडासे यांच्या पथकाने सीसीटीव्हीसह तांत्रिक तपास केल्यावर तो दिल्लीला असल्याची माहिती कळाली. यावेळी त्याच्या दिल्लीच्या मित्रांशी संपर्क करीत, त्यांच्या माध्यमातून त्याचा शोध सुरू केला. तो सापडताच, त्याची समजूत काढून त्याला विमानाने नागपुरात पाठविले. शनिवारी सकाळी तो नागपुरात आल्यावर त्याचे समुपदेशन करीत, त्याला कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले.
या घटनेविषयी नागपूर पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “मुलगा कोणत्याही चुकीच्या संगतीत सापडला नव्हता, केवळ घरगुती वादातून तो पळून गेला होता.” तो मानसिकदृष्ट्या स्थिर असून कुटुंबीयांसोबत पुन्हा संपर्कात आहे.
पोलिसांच्या मते, ही घटना केवळ किशोरवयीन भावनांचा विस्फोट आहे. घरातील संवादाचा अभाव आणि लहानशा कारणांवरून होणारे वाद मोठ्या निर्णयांचं कारण बनू शकतात, याचं हे उदाहरण ठरतं.
0 Comments