भीम जयंती : १४ एप्रिल १९२८ रोजी बाबासाहेबांचा पहिला जन्मोत्सव… पण तो कसा आणि कोणी साजरा केला ?

"Clad in spotless white attire, holding blue flags in their hands, and chanting the powerful slogan Jay Bhim' — such a sight unmistakably marks the beginning of Bhim Jayanti celebrations. 



Not just across India, but all over the world, the birth anniversary of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, the chief architect of the Indian Constitution, is celebrated with great pride and grandeur on April 14."




शुभ्र पांढरे धवल वस्त्र परिधान करून, हाती निळे झेंड घेत आणि जय भिमचा एकच जयघोष करताना लोकं दिसली, म्हणजे भिमजयंतीचा महोत्सव सुरू आहे, एवढं स्पष्ट होतं. केवळ देशभरातच नाही, तर अवघ्या विश्वभरातच भारतीय राज्यघटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी मोठ्या दिमाखदार स्वरूपात जयंती साजरी केली जाते. 


शेकडो वर्षांचा अंधकाराचा अंत म्हणजे भिम जयंती मोठ्या दिमाखात साजरी केली जाते. 

आज एवढ्या मोठ्या स्वरूपात साजरा करण्यात येणाऱ्या या भिम जयंतीचा उत्सव नक्की कधीपासून सुरू झाला? कुठे सुरू झाला ? मुख्य म्हणजे कोणा सुरू केला? असा प्रश्न आपल्याला नक्कीच कधी ना कधी पडलेला असेल. याच गोष्टीचा 'सरकारनामा'ने आपल्या वाचकांसाठी घेतलेला हा आढावा.. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस म्हणजे केवळ एका महामानवाचा वाढदिवस नव्हे, तर सामाजिक क्रांतीच्या सुरूवातीचं एक सजीव प्रतीक. आणि

 या इतिहासघडवणाऱ्या परंपरेची सुरुवात करणारे होते थोर समाजसुधारक जनार्दन सदाशिव रणपिसे. 


१४ एप्रिल १९२८ रोजी, पुणे शहरात डॉ. आंबेडकर यांची जयंती सर्वप्रथम साजरी करण्यात आली. या अभूतपूर्व उपक्रमामागे रणपिसे यांची दूरदृष्टी आणि सामाजिक जागृतीची धग होती. खडकीच्या पत्र विभागातील दलित मंडळाचे अध्यक्ष असताना, त्यांनी बाबासाहेबांची प्रतिमा थेट हत्तीच्या अंबारीत विराजमान केली. हा केवळ एक शोभेचा देखावा नव्हता, तर दलित अस्मितेचा गजर होता. पुढे प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून आणि उंटांवरून देखील मिरवणुका निघाल्या – त्या काळात असा उत्सव म्हणजे समाजाला जागं करण्याचा एक धगधगता मशालच होता. 


जनार्दन सदाशिव रणपिसे – हे नाव म्हणजे एका संघर्षशील आणि प्रेरणादायी जीवनाचा इतिहास. 

त्यांचा जन्म २४ ऑगस्ट १८९८ रोजी सासवड येथे झाला. ज्या काळात दलितांसाठी शिक्षण म्हणजे स्वप्नासारखं होतं, त्या काळात रणपिसे हे पुणे जिल्ह्यातील पहिले मॅट्रिक पास झालेले दलित विद्यार्थी ठरले. पुढे फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी दोन वर्षे अध्ययन केलं – हे त्याकाळात अत्यंत दुर्मिळ होतं. 


केवळ स्वतः शिकण्यातच ते रमले नाहीत, तर १९१८ ते १९२१ या कालावधीत ‘सन्मार्ग दर्शक मंडळा’ची स्थापना करून त्यांनी सामाजिक क्रांतीचा पाया घातला. व्याख्याने, नाटके, सभा, प्रौढ शिक्षणवर्ग यांच्याद्वारे त्यांनी समाजात नवे विचार पेरले. तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे म्हणून व्यायामशाळा सुरू केल्या – म्हणजेच शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक विकासाचा त्रिसूत्री विचार त्यांनी त्या काळातच रुजवला. 


रणपिसे यांचे कार्य म्हणजे आशेची मशाल होती – जी काळोखातही प्रकाश पेरत राहिली. त्यांनी सुरू केलेली भीम जयंती साजरी करण्याची परंपरा आजही लाखो हृदयात अभिमानाने जपली जाते.


अश्याच प्रकारची नवनवीन माहिती ताज्या घडामोडी इतिहास संदर्भात सरकारी योजने संदर्भात माहिती जाणून  घेण्यासाठी आमच्या सरकारी माहिती गड या संकेस्थळाला व्हिजिट करा आणि उजव्या बाजूला जी whatsapp बटन दिसत आहे तिला क्लिक करून आमचं सरकारी माहिती ग्रुप जॉईन करा......!


Post a Comment

0 Comments