Due to the greed for money, the administration of the reputed Deenanath Mangeshkar Hospital in Pune allegedly delayed treatment, resulting in the death of a woman.
The incident has sparked outrage, as the deceased was the pregnant wife of Sushant Bhise, the personal assistant of BJP MLA Amit Gorkhe, who died during childbirth.
पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला आपला जीव गमावावा लागला. पुण्यातील भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या गर्भवती पत्नीचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याच्या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे.
त्यांनी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला पण उपचार मिळण्यास उशीर झाल्याने प्रसूतीदरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तनिषा भिसे यांना प्रसूतीकळा सुरु झाल्याने त्यांना पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यांची परिस्थिती वाईट झाल्याचं सांगत त्यांनी लगेचच पैसे भरायला सांगितलं. प्रसूती किचकट असल्याने दोन बाळांचे 20 लाख रूपये उपचारांसाठी भरावे लागतील
असं रूग्णालयाकडून सांगण्यात आलं. सुशांत भिसे यांनी विनंती केल्यानंतर 20 पैकी 10 लाख आता भरावे लागतील, असं रूग्णालयाकडून सांगण्यात आलं. कुटुबांने 3 लाख भरण्याची तयारी दाखवली पण रुग्णालय प्रशासन 10 लाख रूपये भरा यावरती ठाम होतं. जवळपास भिसे परिवाराच्या घरी आठ वर्षांनी गुड न्यूज आली पण नियतीने आणि रूग्णालयाच्या निर्णयाने सगळ्यावरती विरजण पडलं.
आठ वर्षांपूर्वी तनिषा-सुशांतचा विवाह
सुशांत भिसे आणि तनिषा भिसे यांचा प्रेमविवाह आठ वर्षांपुर्वी झाला होता.आणि दोघेही कर्वेनगरमध्ये राहत होते. दोघांची ओळख मित्र- मैत्रिणींच्या माध्यमातून झाली. या दोघांचा आठ वर्षांपासून प्रेमाचा संसार फुलला होता. तनिषा या पूर्वी शिक्षिका म्हणून देखील काम करत होत्या. मात्र, लग्नानंतर काही वर्षांनी त्यांनी काम सोडून दिलं. यादरम्यान, सुशांत यांना प्रशासकीय विभागामध्ये नोकरी लागली.
प्रशासकीय विभागामध्ये नोकरी मिळाल्यानंतर अगदी योग्यरितीने त्यांच्या सुखी संसार सुरू होता. दरम्यान, सुशांत भिसे यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये देखील सक्रियपणे सहभाग घेतला. परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी सुशांत यांना आरोग्यदूत हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. या सुखी संसांरात तब्बल आठ वर्षांनी गुड न्यूज आली. पण नियतीच्या आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी हे सुख मात्र तनिषा-सुशांतला लाभलं नाही.
आठ वर्षांनी घरात पाळणा हलणार होता
तब्बल आठ वर्षानंतर पहिल्यांदाच त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार होतं. आठ वर्षांनी त्यांच्या आयुष्यात आई-बाबा म्हणणारे आणि घरभर फिरणारी चिमुकली पावलं येणार होती. दोघेही खूप खुश होते. अशातच तनिषा या एक नाही तर दोन बाळांना जन्म देणार होत्या, त्यामुळे त्यांचा आनंद देखील मोठा होता पण त्या आनंदावर असं विरजण पडलं...
0 Comments