आज जिल्हा नियोजन भवन, गडचिरोली येथे आदिवासी विकासासाठी महत्त्वपूर्ण बैठक...!

Important meeting for tribal development at District Planning Building, Gadchiroli today!

आज आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोकजी उईके साहेब आणि सहपालकमंत्री तथा राज्यमंत्री ॲड. आशिषजी जयस्वाल साहेब यांच्या उपस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकास व आविका संस्था मधील घोटाळ्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीत भाकरोंडी येथील आश्रम शाळा व एकलव्य शाळा यांचे विभाजन करून त्यात आवश्यक सुधारणा करणे, निवासी आश्रम शाळेत योग्य सोयी-सुविधा पुरवणे, तसेच पाणीटंचाई, विद्युत पुरवठा आणि वीज समस्यांबाबत मंत्री महोदयांसमोर मुद्देसूद मांडणी करण्यात आली व आविका संस्था गोठणगाव व  देऊळगाव ( शिरपूर ) मध्ये झालेल्या घोटाळ्याची योग्य चौकशी करून आरोपींना कठोरात कठोर कार्यवाही करावी अशी विनंती मंत्री महोदयांजवळ करण्यात आली

 


आरमोरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आमदार रामदास मसराम साहेब नेहमीच कटिबद्ध असून अशा विविध समस्या सोडवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहतील!



Post a Comment

0 Comments