आरमोरी विधानसभा क्षेत्रातील वन्यप्राणी हैदोसाबाबत मुख्य वनसंरक्षकांची भेट...!

Chief Conservator of Forests meets regarding wildlife threat in Armori assembly constituency


गडचिरोली, दि. ११ एप्रिल – आज गडचिरोली येथील मुख्य वनसंरक्षक यांची भेट घेऊन आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या वन्यप्राण्यांच्या हैदोसाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


 विशेषतः हत्ती आणि वाघांच्या उपस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


या भागातील शेतजमिनींवर वस्ती करून राहणाऱ्या हत्तींमुळे पिकांची हानी होत असून, काही ठिकाणी जनावरांवरही हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.यासंदर्भात वनविभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.


मुख्य वनसंरक्षकांसमवेत झालेल्या चर्चेत पीडित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देणे, वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी प्रभावी कुंपण, ड्रोन सर्वेक्षण, गस्त व इतर तांत्रिक उपाययोजना राबवण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या.


यावेळी प्रशासनाकडून या समस्येवर लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी संयम बाळगावा आणि वनविभागाशी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले. 

यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गड महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे,माजी जिल्हा प. उपाध्यक्ष गड तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जीवन पाटील नाट, माजी जिल्हा प. सदस्य गड प्रभाकर तुलावी, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, माजी काँग्रेस क. तालुकाध्यक्ष कुरखेड .जयंत हरडे,भाग्यवान मेश्राम,कमलेश बारस्कर, सागर वाढई, आशिष अग्रवाल, बांबोळे साहेब,गरीबदास बाटबरवे,स्वप्नील मिसार,गौरव शिलार,शैलेश येलगंदवार उपस्थित होते

Post a Comment

0 Comments