MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदांसाठी पदभरती -- अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू....!

  "In response to the urgent call from the Department of Agriculture, Animal Husbandry, Dairy Development, and Fisheries, the Maharashtra Public Service Commission (MPSC) has officially kicked off the much-awaited recruitment for the prestigious position of Livestock Development Officer (Group-A), offering an incredible opportunity for aspiring candidates!"


राज्य शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या मागणीनुसार,


 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पशुधन विकास अधिकारी, गट-अ या संवर्गातील पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


या भरती प्रक्रियेमध्ये पशुसंवर्धन विभागातील एकूण 2795 पदे भरली जाणार आहेत.


२९ एप्रिल २०२५ पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केली आहे.


या भरतीमुळे अनेक बेरोजगार उमेदवारांना उत्तम करिअरची संधी उपलब्ध होणार असून, इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पशुधन विकास अधिकारी भरती 2025

महत्त्वाची माहिती - पशुधन विकास अधिकारी भरती 2025
एकूण रिक्त जागा 2795
रिक्त पदाचे नाव पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ
शैक्षणिक पात्रता पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी
वयोमर्यादा 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी खुला प्रवर्ग: ₹394/-
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹294/-
पगार ₹56,100/- ते ₹1,77,500/-
नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र


अधिकृत संकेतस्थळ : mpsconline.gov.in


उमेदवारांसाठी सूचना 


• अर्ज करण्याआधी संपूर्ण भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. 


• सर्व शैक्षणिक पात्रतेची, आरक्षण प्रमाणपत्रांची आणि इतर आवश्यक कागदपत्रांची तयारी करून ठेवावी. 


• अंतिम तारीख उलटण्याच्या अगोदर अर्ज सादर करावा, अन्यथा तांत्रिक अडचणींमुळे संधी गमावली जाऊ शकते. 

सरकारी माहिती

अशाच प्रकारची नवनवीन रोजगार संदर्भात माहिती, कृषी व चालू घडामोडी बातम्या, अन्य नोकरी आणि सरकारी नोकरी संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या सरकारी माहिती या संकेस्थळाला व्हिजिट करा आणि उजव्या बाजूला जी हिरव्या रंगाची बटन दिसत असेल तिला क्लिक करून आमच्या WhatsApp group मध्ये जॉइन करू शकता.

Join WhatsApp Group


ही संधी घेऊन महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन क्षेत्रात आपल्या कारकिर्दीला भक्कम पाया घालण्याची सुवर्णसंधी आहे. योग्य उमेदवारांनी वेळ वाया न घालवता लवकर अर्ज करावा!

Post a Comment

0 Comments