"Maharashtra SSC Board Result 2025 Live: The wait for the Class 10 result is finally coming to an end! Results to be announced shortly."
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे इयत्ता 10वी (SSC) बोर्ड परीक्षा 2025 चा निकाल आज 13 मे रोजी जाहीर करणार आहे.
🔍 महाराष्ट्र बोर्ड निकाल 2025
SSC/HSC विद्यार्थ्यांसाठी – आपला Roll Number घेऊन थेट निकाल पाहण्यासाठी खाली माहिती भरा.
हे बटण महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर नेईल. आपला निकाल पाहण्यासाठी Roll Number आणि Mother's First Name तयार ठेवा.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE) इयत्ता दहावीचा निकाल
आज, १३ मे २०२५ रोजी जाहीर होतो आहे. हा दिवस राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिकदृष्ट्या निर्णायक आहे. दहावीचा निकाल केवळ शैक्षणिक प्रवासातील एक टप्पा नसून, पुढील वाटचालीसाठी एक दिशादर्शक ठरतो.
यावर्षी राज्यभरातून सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसले होते. ही परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये पार पडली होती. निकाल दुपारी १ वाजता ऑनलाइन स्वरूपात जाहीर केला जाणार असून, विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळांवर आपला रोल नंबर व इतर माहिती टाकून निकाल पाहता येणार आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांसाठी हा आनंदाचा क्षण असतो, पण काहींसाठी तो अपेक्षेप्रमाणे नसेल. अशावेळी विद्यार्थ्यांनी व पालकांनी संयम ठेवून पुढील संधींकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. निकाल हे अंतिम सत्य नसून, प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी असते आणि ती वेळेनुसार सिद्ध करता येते.
निकालानंतर अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया लगेच सुरू होईल. कॉलेज निवडताना फक्त गुण न पाहता विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी, भविष्यातील उद्दिष्टे आणि शैक्षणिक प्रवाह यांचा विचार करणं महत्त्वाचं ठरेल.
ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजता उपलब्ध होणार
विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी खालील अधिकृत संकेतस्थळांचा वापर करता येईल:
• 🔹 mahresult.nic.in
• 🔹 sscresult.mahahsscboard.in
• 🔹 results.targetpublications.org
ऑफलाइन पर्यायही उपलब्ध
वेबसाइट्सवर तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेता, विद्यार्थी एसएमएस, डिजीलॉकर अॅप किंवा शाळेच्या माध्यमातून देखील त्यांचा निकाल मिळवू शकतात. हे पर्यायी मार्ग वेळेची बचत करण्यास आणि तणाव टाळण्यास मदत करतात.
निकाल पाहताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी:
• विद्यार्थी आपला रोल नंबर आणि आईचे संपूर्ण नाव टाकून निकाल पाहू शकतात.
• वेबसाईट उघडण्यास उशीर लागल्यास थोडा संयम बाळगावा.
• डिजीलॉकर वापरण्यासाठी पूर्वनोंदणी करून ठेवलेली असल्यास सोयीचे ठरेल.
निकालानंतरचे टप्पे:
निकाल पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याची छायाप्रती सेव्ह करून ठेवावी. मूळ गुणपत्रक काही दिवसांनी शाळेमार्फत मिळेल. यानंतर विद्यार्थी 11वी प्रवेशासाठी अर्ज करू शकतात, तसेच पुनर्परीक्षा किंवा पुनर्मूल्यांकनासाठीही विहित तारखांमध्ये अर्ज करता येईल.
0 Comments