अतिदुर्गम 'गट्टा' (जांबिया) भागात खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा जनतेशी थेट संवाद : नागरिकांच्या व परिसरातील ग्रामसभांच्या जाणून घेतल्या समस्या.

"In the extremely remote 'Gatta' (Jambia) region, Member of Parliament Dr. Namdev Kirsan engaged in direct dialogue with the public: He listened to the issues faced by the citizens and the local village assemblies."

    गडचिरोली: गडचिरोली-चिमूर लोकसभा

मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गट्टा भागाला भेट देत थेट जनतेशी संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी परिसरातील ग्रसमसभांच्या प्रतिनिधिंची बैठक घेतली व आदिवासी बहुल परिसरातील नागरी समस्यांचा बारकाईने आढावा घेतला.


स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांमध्ये प्रथमच एखाद्या खासदाराने या दुर्गम भागात प्रत्यक्ष येऊन लोकांच्या समस्या ऐकल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. स्थानिक नागरिकांनी पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, नाल्यांची समस्या, आरोग्य सुविधा, विजेचा अनियमित पुरवठा, अशा विविध मुद्द्यांवर आपली व्यथा मांडली.

खासदार डॉ. किरसान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना,"दुर्गम भागातील जनतेला त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले जाणार नाही. सर्व समस्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ राबवा," असे निर्देश दिले.


 या बैठकीस गडचिरोली माजी जि प सदस्य सैनू गोटा, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलावार, आदिवासी  सेल अध्यक्ष हनुमंतू मडावी, माजी जि. प., सदस्य सैन्यूजी गोटा, अनुसूचित जाती विभाग सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, तालुका अध्यक्ष रमेश गंपवार, नगरसेवक निजाम पेंदाम, लोकेश गावडे, प्रज्वल नागूलवार, सचिन मोतकूलवार, शिलूताई गोटा, सतीश मुप्पलवार, जगदीश मेश्राम, सुरज जक्कुलवार, बंटी जुनघरे,  स्वप्नील मडावी, कन्नाजी गोटा, संजय गिरे, रवी अलोणे, रामदास उसेंडी, विष्णू हिचामी, बंडू हेडो, प्रभाकर दुर्गे, प्रमोद देवतळे तसेच गट्टा-जांभिया परिसरातील ग्रामसभेचे पदाधिकारी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकारात्मक प्रतिसाद

गावकऱ्यांनी खासदारांच्या या दौऱ्याचे स्वागत करत ही ऐतिहासिक भेट ठरल्याचे सांगितले. "खासदार स्वतः येऊन आमचं ऐकतात हेच आमच्यासाठी मोठं आहे," अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

Post a Comment

0 Comments