"एकेकाळी टीव्ही न पाहणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा थिएटरकडे वळवलं, त्या नटसम्राट अशोक सराफ यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित"!

 "Ashok Saraf, the comedy legend who drew even non-TV viewers back to theatres, honoured with the Padma Shri by President Droupadi Murmu!"


अशोक सराफ यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव 


नवी दिल्ली, २७ मे २०२५: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि हास्यसम्राट अशोक सराफ यांना त्यांच्या अभूतपूर्व अभिनय योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. राष्ट्रपती भवनात आयोजित भव्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला . 


या पुरस्कार सोहळ्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते . अशोक सराफ यांच्या पत्नी, अभिनेत्री निवेदिता सराफ आणि भाऊ सुभाष सराफही या प्रसंगी उपस्थित होते. 

अशोक सराफ यांना सगळे प्रेमाने "मामा" म्हणून ओळखतात. त्यांचा जन्म १९४७ साली मुंबईत झाला. १९६९ पासून ते चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात 'जानकी' या चित्रपटातून केली. त्यानंतर असे बरेच चित्रपट त्यानी ऐकाहुन अनेक चित्रपट काम केले 80 आणि 90 चा काळ त्यानी एवढा गाजवला की लोक अक्षरशः वेडे झाले त्याचे चित्रपट बघायला इतका मामाच क्रेज होता. 'आयत्या घरात घरोबा', 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'भूताचा भाऊ', 'धुमधडाका' अशा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. आजवर त्यांनी ३०० पेक्षा जास्त चित्रपटांत काम केलं आहे.

पण लोक आजही अशोक मामाचे चित्रपट बघून हसतात

कारण ते फक्त अभिनय करत नव्हते तर लोकांना काय पाहिजे काय अपेक्षा आहे किंवा विनोदी कलाकार असेल तर तो कसा असेल या सगळ्या गोष्टी कडून त्यांचं निरीक्षण तगडा होत म्हणून आज सुद्धा त्यांचे चित्रपट बोर वाटत नाही उलट बार बार एकच सीन बघावास वाटत त्यानी त्यानी एक प्रेक्षक वर्ग काय विचार करतो याचा याची कल्पना फक्त अशोक मामाना असायचं म्हणूनच तर त्यांचे सगळे मराठी चित्रपट blockbuster आहेत.


विनोदी भूमिकांमुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले. विशेषतः सचिन पिळगांवकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. केवळ सिनेमांपुरतेच मर्यादित न राहता त्यांनी मराठी रंगभूमीवरही आपली छाप सोडली आहे.

फक्त मराठी नव्हे, तर हिंदी चित्रपटांमध्येही अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 'सिंघम' या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. याशिवाय 'गुप्त', 'कोयला', 'येस बॉस', 'करण अर्जुन', 'प्यार किया तो डरना क्या' यांसारख्या हिट हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं आहे.


त्यांचा सहजसुंदर अभिनय, विनोदी शैली आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्व आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवून आहे.


पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे. मी महाराष्ट्र शासनाचे, माझ्या कुटुंबीयांचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानतो. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं. तुमचा प्रेम आणि आशीर्वाद कायम असाच राहू द्या" 

अशोक सराफ यांनी आपल्या कारकिर्दीत 'अशी ही बनवाबनवी', 'आशीर्वाद', 'सिंघम', 'येस बॉस', 'हम साथ साथ हैं' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या विनोदी अभिनयशैलीमुळे ते प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून राहिले आहेत. 


पद्मश्री हा भारत सरकारकडून दिला जाणारा चौथ्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे, जो विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जातो. अशोक सराफ यांना मिळालेला हा सन्मान संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद ठरला आहे. 

हा पुरस्कार त्यांच्या दशकांतील अथक परिश्रम, समर्पण आणि अभिनयातील उत्कृष्टतेची पावती आहे. त्यांच्या या यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना नवी प्रेरणा मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments