गडचिरोली जिल्ह्याच्या टोल्यांतील महिलांना अंगणवाडी सेविका पदासाठी प्राधान्य देण्याची आमदार श्री रामदासजी मसराम यांची मागणी.

"MLA Shri Ramdasji Masram has demanded that women from the tribal areas of Gadchiroli district be given priority for the post of Anganwadi Sevika."


गडचिरोली राज्य शासनामार्फत सध्या अंगणवाडी सेविका पदाकरिता भरती प्रक्रिया सुरु असून, या भरतीमध्ये महसुली गावातील उमेदवारांना प्राधान्य देण्याची अट लागू करण्यात आलेली आहे. 

मात्र, गडचिरोलीसारख्या दुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या पार्श्वभूमीवर ही अट अन्यायकारक ठरत असल्याने, टोल्यांमधील स्थानिक महिलांना प्राधान्य देण्याची मागणी होत आहे.


गडचिरोली जिल्ह्यात अनेक टोल्यांमध्ये महिलांनी शासकीय योजनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. या महिलांना स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि बालकल्याण सेवांचा दर्जाही वाढावा, यासाठी शासन निर्णयात बदल करण्याची मागणी आमदार श्री. रामदासजी मसराम यांनी केली आहे.

या अनुषंगाने आमदार रामदास मसराम सर यांनी महिला व बालकल्याण विकास मंत्री कु.अदिती तटकरे यांच्याशी चर्चा करून लेखी निवेदन सादर केले आहे.यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, महसुली गावातील उमेदवारांना टोल्यांमध्ये कार्य करताना दळणवळणाच्या अडचणींमुळे नियमित सेवा देणे कठीण जाते. याच्या उलट, टोल्यातील स्थानिक महिला अधिक प्रभावीपणे आणि सातत्याने सेवा देऊ शकतात.

या मागणीला स्थानिक स्तरावरही मोठा पाठिंबा मिळत असून, शासनाने लवकरात लवकर यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन टोल्यातील महिला उमेदवारांसाठी संधी उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments