१० वी १२ वी नंतर पुढे काय? Instagram वर फक्त bestie ला रील पाठवून टिंगल-टवाळी करण्यापेक्षा हे ५ डिजिटल कोर्स करा – तुमच फ्यूचर एकदम सेट होईल..!

What’s next after 10th or 12th?
Instead of just sending reels to your bestie on Instagram 
and goofing around,do these 5 digital courses – they’ll set your future on the right track!"

खूपदा १० वी किंवा १२ वी झाल्यानंतर अनेक तरुणांना हे कळत नाही की पुढे काय करायचं. 

काहींना कॉलेजची इच्छा नसते, काही जण तात्काळ नोकरी करू इच्छितात. काही मुलं सुट्टीची मजा घेतात तर काही मुलं वेळ वाया जाऊ देतात त्या एका वर्षात आपण कितीतरी डिजिटल कोर्स करून स्वतःमध्ये एक वेगळाच कौशल्य निर्माण करू शकतो जेणेकरून आपल्या भविष्यात समोर खुप साऱ्या सोनेरी संधी येऊ शकतात आणि नेमकं ह्याच स्किल शिकण्या अगोदर आपण टाईम बरबाद करतो इन्स्टग्राम वर बेस्टी ला रील पाठवतो मित्रासोबत टिंगळ टवाळी करतो. मोबाईल मधून काय काय गोष्टी आपण शिकू शकतो ह्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असते. फालतू गोष्टी कडे मुलांचं जास्त लक्ष जाते ही वेळ गेली तर नंतर पस्तावतो इन्स्टग्राम वर टाईमपास करत बसतो मग अश्या वेळी काय करायचं जे की तुमच स्किल वाढेल तुम्ही भविष्यात खूप मोठया डिजिटल पदावर पण काम करू शकता. अशा वेळी एक गोष्ट खूप उपयोगी पडते – सर्टिफिकेट कोर्सेस. हे कोर्स कमी कालावधीचे असतात, सहज शिकता येतात आणि तुमच्याकडे एक प्रॅक्टिकल कौशल्य असतं – जे तुम्हाला ताबडतोब नोकरी, फ्रीलान्सिंग किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी देतं. 

चला तर मग, अशाच ५ कोर्सेसबद्दल सविस्तर माहिती घेऊया जे १० वी, १२ वी नंतरचे सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. 


१. डिजिटल मार्केटिंग – इंटरनेटचा वापर करून पैसे कमवा 


आज जग डिजिटल झालंय. प्रत्येक व्यवसायाला, दुकानाला, ब्रँडला इंटरनेटवर जाहिरात लागते. ही जाहिरात म्हणजेच डिजिटल मार्केटिंग. सोशल मीडियावर जाहिरात करणं, वेबसाइटसाठी लेखन करणं, गूगलवर पेड अॅड चालवणं – हे सगळं या कोर्समध्ये शिकवलं जातं. 

हा कोर्स कोणीही करू शकतो – फक्त इंटरनेट आणि स्मार्टफोन वापरता येणं पुरेसं आहे. गूगल, कोर्सेरा, उदेमी यासारख्या वेबसाईट्सवर हे कोर्स ऑनलाईन मोफत किंवा अतिशय कमी दरात उपलब्ध आहेत. सुरुवातीला तुम्ही ३ ते ६ महिन्यांत कोर्स करून सर्टिफिकेट मिळवू शकता. 


सर्वात खास गोष्ट म्हणजे, कोर्स झाल्यावर तुम्ही घरबसल्या फ्रीलान्सिंग करू शकता, क्लायंट्स मिळवू शकता किंवा एखाद्या कंपनीत डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव म्हणून काम करू शकता. 


२. ग्राफिक डिझाईन – तुमचं आर्ट आता कमाईचं साधन बनवा 


जर तुम्हाला चित्रकला, रंगसंगती, डिझाईन, किंवा सोशल मीडियासाठी पोस्ट तयार करणं आवडत असेल, तर ग्राफिक डिझाईन हा कोर्स तुमच्यासाठी उत्तम आहे. यात तुम्ही शिकता: 


• फोटोशॉप वापरणं 


• लोगो डिझाईन करणं 


• यूट्यूब थंबनेल, बॅनर, सोशल मीडियासाठी क्रिएटिव्ह तयार करणं 


शिकण्यासाठी तुम्ही Canva, Udemy, Coursera वापरू शकता. YouTube वरही मराठीतून शिकवणारे चांगले चॅनल्स आहेत. सुरुवातीला तुमचं काम Instagram वर शेअर करा, एक पोर्टफोलिओ तयार करा. यानंतर क्लायंट्स मिळवणं सहज शक्य आहे. 


३. कंप्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग – हातात कला, कामात कमाई 


संगणक दुरुस्त करणे, हार्ड डिस्क किंवा RAM बसवणं, वायफाय नेटवर्क जोडणे – अशा टेक्निकल गोष्टी ज्या लोकांना आवडतात, त्यांनी हा कोर्स जरूर करावा. 


हा कोर्स खाजगी संस्था (जसं Jetking, IIHT) किंवा सरकारी ITI मध्ये शिकता येतो. हा ६ महिने ते १ वर्षाचा असतो. कोर्स झाल्यानंतर तुम्ही शाळा, ऑफिस, दुकानं, सायबर कॅफेमध्ये हार्डवेअर टेक्निशियन म्हणून काम करू शकता. इच्छाच असेल तर स्वतःचं रिपेअरिंग दुकानही सुरू करता येईल. 


४. ITI किंवा NSTI ट्रेड कोर्सेस – हाताने शिकवणारी खरी शाळा 


ITI (Industrial Training Institute) हे भारत सरकारचं व्यावसायिक शिक्षण देणारं महत्त्वाचं नेटवर्क आहे. इथे १० वी/१२ वी नंतर तुम्ही अनेक ट्रेड्स शिकू शकता – जसं की इलेक्ट्रिशियन, फिटर, AC/फ्रिज रिपेअरिंग, प्लंबिंग वगैरे. 


हे कोर्स दोन वर्षांचे असतात, आणि पूर्णपणे प्रॅक्टिकल असतात. कोर्स झाल्यानंतर रेल्वे, महावितरण, PWD, MIDC अशा सरकारी विभागात नोकरीच्या संधी मिळतात. किंवा स्वतःचं दुकानही सुरू करता येतं. 


ITI साठी dvet.gov.in वरून अर्ज करता येतो. 


५. MS-CIT / टायपिंग / डेटा एंट्री – प्रत्येक नोकरीची पायरी 


तुम्ही कोणतीही नोकरी शोधत असाल – सरकारी की खासगी – संगणकाचं प्राथमिक ज्ञान असणं आवश्यक आहे. MS Word, Excel, Email वापरणं, इंटरनेटचा वापर – हे सगळं MS-CIT मध्ये शिकवलं जातं. 


मराठी/इंग्रजी टायपिंगचं वेग (WPM) वाढवलं तर डेटा एंट्रीसारख्या नोकऱ्या सहज मिळू शकतात. अनेक सरकारी फॉर्म भरण्यासाठीही या कौशल्यांची गरज असते. 


हा कोर्स MKCL च्या सेंटरवर ३ महिन्यांत पूर्ण होतो. सर्टिफिकेट मिळाल्यावर, तुम्ही क्लार्क, ऑफिस असिस्टंट, बँकिंग ऑपरेटर अशा अनेक नोकऱ्यांसाठी पात्र होता. 


🔚 निष्कर्ष – तुमचा कोर्स, तुमचं करिअर 


शिक्षण कमी असेल तरी स्किल कमी नसावं. कारण आजचा जमाना स्किलचा आहे. १० वी, १२ वी नंतर लगेच पुढचं शिक्षण न करताही हे सर्टिफिकेट कोर्स करून तुम्ही चांगली नोकरी, व्यवसाय, किंवा ऑनलाईन कमाई सुरू करू शकता. 

म्हणूनच, वेळ वाया घालवू नका – आजच तुमच्या आवडीनुसार एक कोर्स निवडा आणि यशाच्या वाटेवर पाऊल ठेवा. कारण वेळ ही कधीच कुणासाठी थांबत नाही त्यामुळे आपल्यालाच या योग्य वेळेचा उपयोग केला पाहिजे..! 

Post a Comment

0 Comments