येंगलखेडा येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते..

"The paddy procurement center at Yengalkheda was inaugurated by MLA Ramdas Masram."

दिनांक ०९ जून येंगलखेडा, ता. कुरखेडा जि. गडचिरोली


तालुका कुरखेडा येथील आदिवासी विविध कार्यकारी सह संस्था मर्या., येंगलखेडा अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या धान खरेदी केंद्राचे उद्घाटन६७ - आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री रामदासजी मसराम यांच्या हस्ते पार पडले.

उद्घाटन सोहळ्यावेळी आमदार रामदास मसराम यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत सांगितले की, "ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या घराजवळच धान खरेदीची सुविधा मिळणे ही काळाची गरज होती. 

हे केंद्र सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रवासाचा त्रास, वाहतूक खर्च आणि दलालांचा मधल्यामधला हस्तक्षेप टळणार आहे."


या वेळी उपस्थित;माजी जिल्हा प. उपाध्यक्ष गड तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जीवन पाटील नाट, सरपंच येंगलखेडा एस.व्हि.हलामी,माजी उपसरपंच आर.व्हि.किरणापुरे, संस्थेचे अध्यक्ष वाय. एस.पारसे, संस्थेचे उपाध्यक्ष किरनापुरे साहेब,सचिव टी.एम. चन्ने, माजी सभापती डी. के. चुरगाय, माजी उपसभापती व्हि. एन.चन्ने, माजी पो.पा.यु.डी.बावनथडे, माजी से.नि.शिक्षक.आर.डी.बावनथडे



युवा काँग्रेस विधानसभा अध्यक्ष कमलेश बारस्कर,युवक काँग्रेस क.तालुकाध्यक्ष कुरखेडा प्रांजल धाबेकर, संचालक : आर. व्हि. आत्राम, आर.डी. सेलोकर,आर.जी हलामी,यु.एच.कोसरे,श्रीमती कुंभरे मॅडम,जे.पी.नैताम,पी,एस.होळी,एम,के.वट्टी,पी.आर.तागडे,पी.के.कोडप, माजी संचालक जे. एस. कापकर,माजी संचालक के. टी मेश्राम,डी.एन.वट्ट,चंदू पारसे, योगाजी चन्ने,मथूर मडावी, रामचंद्र पुराम,तसेच स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या धानाला योग्य दर मिळण्यास मदत होणार असून, शासनाच्या योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल.



Post a Comment

0 Comments