"Deadline Extended for e-Crop Registration – MLA Ramdas Masram’s Efforts Succeed!"
नागपूर– दिनांक ०२ जून २०२५ रोजी नागपूर येथे आमदार मा. श्री. रामदासजी मसराम यांनी राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन आरमोरी विधानसभा क्षेत्रातील तसेच संपूर्ण जिल्ह्यातील धान पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या.
शेतकऱ्यांना ई-पिक नोंदणीसाठी मिळालेल्या मुदतीत तांत्रिक अडचणी व इतर कारणांमुळे अनेकांनी नोंदणी करू शकलेली नाही. त्यामुळे ई-पिक नोंदणीसाठी मुदत वाढ देण्यात यावी, अशी विनंती आमदार मसराम यांनी मंत्री श्री. बावनकुळे साहेब यांच्याकडे केली.
या विनंतीची तात्काळ दखल घेत महसूल मंत्री यांनी संबंधित सचिवांना त्वरित आदेश देत मुदतवाढ देण्यास सहमती दर्शवली. लवकरच याबाबतचा अधिकृत आदेश जारी होणार आहे.
आमदार रामदास मसराम यांच्या या तात्काळ पुढाकारामुळे आरमोरी विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यातील हजारो धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांचे हक्क आणि सोयी यासाठी आमदार मसराम सातत्याने कार्यरत असून, हा निर्णय त्यांच्या सक्रिय पाठपुराव्याचे फलित ठरले आहे.
0 Comments