"Salon shop worker attacked with a knife in a deadly assault for not providing beard trimming on credit"
Dharashiv : धाराशिव शहरातील पोस्ट ऑफिसजवळील एक धक्कादायक प्रकार घडला.
ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, धाराशिवमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. उधार दाढी कटिंग न केल्याने दुकानात काम करणाऱ्या तरुणावर सलून दुकानातच धारधार शस्त्राने हल्ला केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत हल्ला झालेला तरुण जखमी झाला आहे.
धाराशिव शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातील न्यू क्लासिक जेंट्स पार्लर येथे ही घटना घडली
आहे.प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने दाढी कटिंगसाठी पैसे न देता उधारीवर काम करण्याची मागणी केली. मात्र, पार्लरमधील कर्मचाऱ्यांनी उधारी नाकारल्यानं संतप्त झालेल्या आरोपीने ऋतुराज मोरे यांच्यावर हल्ला केला.
उधारी दाढी न केल्याने एका माथेफिरूने थेट चाकूने हल्ला केला आहे. या दुर्घटनेत युवक गंभीर जखमी झाला आहे.
ऋतुराज मोरे असे हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या जखमी युवकामर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोपीने माझी दाढी कर तसेच डोक्यावरील केस उधारीवर काप, माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितले. मात्र दुकानातील कर्मचाऱ्यांनी उधार सेवा नाकारल्याने हल्ला करण्यात आल्याची माहिती.
ऋतुराज यांने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आधी दुकानातच मारहाण केली. नंतर त्याला ओढत दुकानाबाहेर नेऊन पुन्हा बेदम मारहाण केली. या हल्ल्यात ऋतुराज यांच्या डोक्याला 5 टाके पडले असून, इतरही गंभीर जखमा झाल्या आहेतदरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करून अशा दहशत पसरवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.
0 Comments