"MLA Ramdasji Masram conducted an inspection of the Zilla Parishad Primary School building at Yengada."
आरमोरी, दि. २१ जून –
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. रामदासजी मसराम यांनी आज येंगाडा (ता. आरमोरी)येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीची पाहणी केली. शाळेच्या इमारतीची दुरुस्ती सुरू असताना आमदार रामदास मसराम यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी करत आवश्यक सूचना दिल्या.
या वेळी शाळा सुरू होण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असताना काम अपूर्ण असल्याचे लक्षात आल्यानंतर आमदार मसराम यांनी संबंधित ठेकेदाराशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. "शाळा लवकरच सुरू होत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इमारतीचे काम वेळेत व योग्य प्रकारे पूर्ण झाले पाहिजे," असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी जबाबदारीचे भान ठेकेदाराला दिले.
या वेळी उपस्थित, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष दिलीप घोडाम, माजी उपसभापती नितीन राऊत, विश्वेश्वर दर्रो, मुन्नाशिंग चंदेल उपस्थित होते
0 Comments