"The Gram Panchayat has passed a resolution to start English-medium education in Angara."
आजाद समाज पार्टी ने केली होती मागणी
कुरखेडा: सप्टेंबर 2024 मध्ये आजाद समाज पार्टीच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत इंग्रजी माध्यम सुरु करण्यासंदर्भात निवेदने देण्यात आली होती. त्यानुसार आजाद समाज पार्टी च्या कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर ग्रामपंचायत मध्ये ठराव मंजूर करण्यासाठी पुढाकार घेतला होता.
त्यानुसार नुकताच अंगारा येथील ग्रामपंचायत मध्ये गावातील जिल्हा परिषद शाळेत पर्यायी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरु करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला. आजाद समाज पार्टीचे कुरखेडा तालुकाध्यक्ष सावन चिकराम यांनी पुढाकार घेऊन ठराव मंजूर करून घेतला व गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत मा. शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन अंगारा येथे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देताना आसपा तालुकाध्यक्ष सावन चिकराम यांचेसह भुचंद धुमाने, स्वप्नील चौधरी, अंकुश कोकोडे, मयूर बावणे उपस्थित होते.
0 Comments