दिशा कमिटीची बैठक संपन्न ; खासदार डॉ. नामदेव किरसान यांची उपस्थिती.

"The DISHA Committee meeting was held successfully; Member of Parliament Dr. Namdev Kirsan was present."


📍 जिल्हा नियोजन भवन, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्हा दिशा समिती (District Development Coordination and Monitoring Committee) 

ची बैठक जिल्हा नियोजन भवन, चंद्रपूर येथे पार पडली

ही बैठक खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या सहअध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी विनायक गौडा आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह हे देखील प्रमुख उपस्थित होते.

   

  या बैठकीत केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. लाभार्थ्यांना योजनांचा परिपूर्ण लाभ मिळावा यासाठी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या.

       

बैठकीदरम्यान जिल्ह्यातील विकासकामे, प्रलंबित प्रकल्प, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, महिला आणि बालकल्याण अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. 

धोरणात्मक अंमलबजावणीत गती आणण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय वाढवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Post a Comment

0 Comments