"A rake of IFFCO and DAP fertilizers will reach Wadsa city by Monday – the efforts of MLA Masram and MP Kirsan have been successful."
शेतकरी बांधवांच्या शेतीसाठी अत्यंत आवश्यक असलेले IFFCO व DAP खतांची मागणी गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात वाढली होती.
मात्र खताचा पुरवठा वेळेवर न झाल्यामुळे अनेक विक्रेते आणि शेतकरी अडचणीत सापडले होते. यासंदर्भात सर्व खत विक्रेत्यांच्या युनियनने आमदार रामदास मसराम यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन तातडीने रॅक उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत आमदार मसराम यांनी खासदार डॉ. नामदेवराव किरसान साहेब यांच्यासमवेत संबंधित विभागाशी सतत पाठपुरावा करून, IFFCO व DAP खताची रॅक वडसा शहरात सोमवारपर्यंत पोहोचेल याची व्यवस्था केली. त्यामुळे येत्या काळात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खत उपलब्ध होणार असून, शेतकऱ्यांच्या काळजाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
खासदार किरसान व आमदार मसराम यांनी वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळेच ही रॅक मंजूर झाली असून, विक्रेते आणि शेतकरी वर्गाने त्यांचे आभार मानले आहेत.
खत विक्रेते युनियनच्या वतीने सांगण्यात आले की, “जर रॅक वेळेवर आली नसती, तर शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असते. पण आता शेतीकाम सुरळीत होईल.”
या सकारात्मक निर्णयामुळे वळसा शहर आणि परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खताच्या रॅकबाबत अधिक माहिती व वितरणाची प्रक्रिया लवकरच युनियनकडून जाहीर केली जाईल.
या वेळी उपस्थित गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र खासदार डॉ.नामदेवराव किरसान साहेब ,तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी वडसा राजेंद्र बुल्ले, माजी सभापती परसरामजी टिकले ,माजी उपसभापती नितीन राऊत, काँग्रेस नेते गणेशजी फाफट, परसरामजी नाट,जावेद शेख, माजी नगरसेवक हरिष मोटवानी, डॉ . परशुराम खुणे, नाट्य कलावंत संजीव रामटेके, प्रल्हाद मेश्राम, विनोद चिलबुले, शुभम पंदरे, नरेश बारसागडे, विवेक कुंडलवार, गोपाल नाकाडे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments