आरमोरी–देसाईगंज मार्गावर भीषण अपघात: नादुरुस्त ट्रक घेऊन येताना ट्रॅक्टर उलटून; चालकाचा जागीच मृत्यू

 "A tractor overturned while transporting an unfit truck, resulting in the death of the driver.


 The incident occurred on the Armori-Desaiganj road around 12:30 PM on July 17."

नादुरुस्त ट्रक घेऊन येताना ट्रॅक्टर उलटून चालकाचा मृत्यू झाला ही घटना आरमोरी देसाईंगंज मार्गावर १७ जुलै रोजी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास घडली.

प्रशांत राजू बोरूले मु पोस्ट  कोंढाळा तालुका देसाईंगंज (वडसा) असे मृत चालकाचे नाव आहे. 

कोंढाळा गावापासून दोन किलोमीटरवर आरमोरी मार्गे चुव्याची धोडी नाला एका ट्रक मध्ये बिघाड झाला होता. प्रशांत बोरूले हा दुपारी 12 वाजता. विना ट्रॉली ट्रॅक्टर घेऊन गेला होता. ट्रक सुरू होत नसल्याने  तसेच ब्रेक निकामी झाल्याने ट्रक आणि ट्रॅक्टर ला मोठे दोरखंड बांधून कोंढाळा या गावी घेऊन येत होते. अशातच धोडीनाला वरील मुख्य मार्गावर 

खोलगट भाग असल्यामुळे ट्रॅक्टर चा वेग वाढल्याने 

ट्रॅक्टर चालक प्रशांत बोरूले ट्रॅक्टरचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे ट्रक ला बांधलेला दोरखंड ढिला होऊन  डायरेक्ट ट्रॅक्टर च्या चाकात आला 

यानंतर ट्रॅक्टर उलटला. आणि अगदी त्याच क्षणी तो प्रशांत बोरूले यांचा मृत्यू झाला. कोंढाळ्याची पोलीस पाटील कुंभलवार यांनी देसाईंगंज पोलीस ठाण्यात माहिती देताच पोलीस घटनास्थळी पोहचले. मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. 

वडिलांनी 4 महिन्या पूर्वीच केली होती आत्महत्या 


विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली होती आता प्रशांत चा अपघाती मृत्यू झाला त्यामुळे कुटुंबावर दुहेरी आघात झालं आहे. प्रशांत च्या पश्चात पत्नी, 4 वर्षाची मुलगी, मोठा भाऊ व आई असा परिवार आहे.     


Post a Comment

0 Comments