"Good News! A golden opportunity specially for Instagram reel creators – brought to you by the Department of Cultural Affairs, Government of Maharashtra: Ganeshotsav Reel Competition."
गणेशोत्सव विषयक रील स्पर्धा : महाराष्ट्र शासनाची आकर्षक घोषणा
मुंबई :
महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने गणेशोत्सव विषयक रील स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. आधुनिक काळात सोशल मीडियाचा प्रभाव वाढत असल्याने, सांस्कृतिक वारसा आणि परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
ही स्पर्धा २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली जाणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी या कालावधीत आपले अर्ज पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
पारितोषिके
या स्पर्धेत जिल्हास्तर, राज्यस्तर तसेच महाराष्ट्राबाहेरील व भारताबाहेरील खुल्या गटांमध्ये वेगवेगळ्या पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
महत्त्वपूर्ण विभाग स्तर
• प्रथम पारितोषिक : रुपये २५,०००
• द्वितीय पारितोषिक : रुपये २०,०००
• तृतीय पारितोषिक : रुपये १५,०००
• प्रोत्साहन पारितोषिके : प्रत्येकी रुपये ५,०००
राज्यस्तर
• प्रथम पारितोषिक : रुपये १ लाख
• द्वितीय पारितोषिक : रुपये ७५,०००
• तृतीय पारितोषिक : रुपये ५०,०००
• प्रोत्साहन पारितोषिके : प्रत्येकी रुपये २५,०००
महाराष्ट्राबाहेर व भारताबाहेरील गट
• प्रथम पारितोषिक : रुपये १ लाख
• द्वितीय पारितोषिक : रुपये ७५,०००
• तृतीय पारितोषिक : रुपये ५०,०००
• प्रोत्साहन पारितोषिके : प्रत्येकी रुपये २५,०००
वैशिष्ट्ये
स्पर्धेतील रील्समध्ये टेक्निक, मनोरंजन व प्रभावी सादरीकरण यावर विशेष भर दिला जाणार आहे.
संपर्क
अधिक माहितीसाठी जनसंपर्क विभाग, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव (पूर्व), मुंबई येथे संपर्क साधावा किंवा मोबाईल क्रमांक +९१ ९७०२२७०८२१वर संपर्क करावा.
👉 ह्या स्पर्धेचा उद्देश गणेशोत्सवाच्या माध्यमातून संस्कृती, परंपरा आणि सामाजिक संदेश नव्या माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचविणे हा आहे.

0 Comments