“मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आताच्या आत अटक करा – राज्यभरात राजकीय चर्चेचं वादळ, पण अस बोलणार नेमका कोण?”

 “Big News! Arrest Manoj Jarange Patil Immediately – A Political Storm Across the State, but Who Exactly Said This?

मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन सुरू आहे. जालन्यातील मनोज जरांगे पाटील हे या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. 

त्यांनी या ठिकाणी उपोषण सुरू केले आहे, जे आंदोलनाची तीव्रता दर्शवते. आज, 31 ऑगस्ट 2025, उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि यामुळे राज्यभरात या आंदोलनाकडे लक्ष वेधले गेले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, हा उपोषण आणि आंदोलन पूर्णपणे शांततामय आहे. ते म्हणतात की हिंसाचार किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास कधीही होणार नाही. या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीला पुन्हा एकदा राज्यभरात चर्चेचा पल्ला गेला आहे, आणि पुढील निर्णय सरकार कसा घेईल, हे सगळ्यांच्याच लक्षात आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मोठं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचं नेतृत्व जालन्यातील मनोज जरांगे पाटील करत आहेत. त्यांचं नाव सध्या घराघरात पोहोचलं आहे.

 तरुणांना, शेतकऱ्यांना, महिलांनाही त्यांनी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरवलं आहे. पण या आंदोलनाचं रूप दिवसेंदिवस तीव्र होत चाललं असून आता याच आंदोलनावरून एक नवा वाद पेटला आहे. 

प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी थेट सरकारला पत्र लिहून मनोज जरांगे पाटलांना अटक करण्याची मागणी केली आहे. सदावर्ते यांनी गृहसचिव आणि छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तांना पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी स्पष्ट लिहिलंय की, जरांगे पाटलांची जालन्यातील सभा हिंसक होण्याची शक्यता आहे. जमाव बेकाबू झाला तर कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उभा राहू शकतो. म्हणूनच वेळ न दवडता त्यांना ताबडतोब अटक करावी. 

सदावर्ते यांची ही मागणी समोर येताच आंदोलनाला एक नवं वळण मिळालं आहे. आधीच सरकारसोबत वारंवार चर्चाही फसत आहेत. मराठा समाजात प्रचंड असंतोष आहे. अशा वेळी जरांगे पाटलांना अटक झाली तर आंदोलन आणखी पेट घेऊ शकतं, अशी भीती व्यक्त होत आहे. 

दरम्यान, या संपूर्ण घडामोडीवर मनोज जरांगे पाटलांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आम्ही नेहमी शांततेत आंदोलन केलंय. कुठल्याही सभेत हिंसाचार झालेला नाही आणि होणारही नाही. सदावर्ते काय बोलतात, याला मी उत्तर देत नाही. ते कुणाचं पिल्लू आहेत, हे सगळ्यांना ठाऊक आहे.” 

आता पुढचा प्रश्न असा आहे की सरकार यावर काय निर्णय घेणार? जरांगे पाटलांची सभा खरोखर शांततेत झाली तर सदावर्ते यांची मागणी पोकळ ठरेल. पण जर गोंधळ झाला तर त्यांचे आरोप बळकट होतील. त्यामुळे राज्यभर सगळ्यांच्या नजरा या सभेकडे लागल्या आहेत. 

मराठा आरक्षणासाठीचा लढा अजून संपलेला नाही. आंदोलन वाढतंय, सरकारवर दबाव वाढतोय आणि त्याच वेळी अशा मागण्या होऊन वातावरण आणखी तापतंय. गावागावात लोकं हाच सवाल करत आहेत – जरांगे पाटलांना अटक झाली तर पुढचं पाऊल काय? आंदोलन कुठल्या दिशेनं जाईल?


Post a Comment

0 Comments