"कोटगुल येथे आमदार रामदास मसराम यांची प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट; नागरिकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या"

MLA Ramdas Masram visits Primary Health Center at Kotgul; interacts with citizens to understand their difficulties" 

कोरची तालुक्यातील कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. 

यावेळी त्यांनी आरोग्य केंद्रातील भरती असलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांची प्रकृती विचारली आणि उपचारांविषयी माहिती घेतली. रुग्णालयातील आवश्यक सुविधा, औषधोपचारांची उपलब्धता तसेच स्वच्छता यांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

यावेळी त्यांनी आरोग्य केंद्रातील भरती असलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांची प्रकृती विचारली आणि उपचारांविषयी माहिती घेतली. रुग्णालयातील आवश्यक सुविधा, औषधोपचारांची उपलब्धता तसेच स्वच्छता यांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. 

या पाहणी दरम्यान आमदार मसराम यांनी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्याकडून दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली. औषध साठा, डॉक्टरांची उपलब्धता, आपत्कालीन सुविधा यांसह इतर सोयी-सुविधांबाबतही विचारणा केली. तसेच नागरिकांच्या तक्रारी व अडचणी प्रत्यक्ष ऐकून तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.

नागरिकांनी यावेळी सांगितले की, “आजवर येथे कधीही लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष पाहणीसाठी आले नाहीत. 

आमदार मसराम हे पहिले आहेत जे स्वतः येऊन रुग्णांची चौकशी करत आहेत.” या भेटीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून, आरोग्य सेवेबाबत सकारात्मक बदल होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कोरची मनोजभाऊ अग्रवाल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जीवन पाटील नाट, जिल्हा परिषद सदस्य रामसुराम काटेंगे, सागर वाढई, वाशिम शेख, कमलेश बारस्कर,माजी सभापती श्रावण मातलाम, काँग्रेस जिल्हा महासचिव  तथा उपसरपंच परमेश्वर लोहांबरे, 

झुलपिकार खेतानी, आविका सो कोटगुल अध्यक्ष रामलाल कोरेटी, उपसरपंच कोसमी नं 02 अंतराम टेंभुर्णे,दानसुर हलामी,रमेश मडकाम,रामसाय कुंभरे, श्यामलाल नूरुटी, नारायण धावळे, सहादेव नैताम, तसेच  स्थानिक पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments