“Thrilling Incident in Mumbai! A running monorail suddenly tilted; and for a moment, passengers felt as if their lives were slipping away… just then…”
मुंबईत मंगळवारी अचानकपणे संध्याकाळी मोनोरेलच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना अक्षरशः जीवघेणा अनुभव आला.
भक्ति पार्क आणि म्हैसूर कॉलनी स्थानकांच्या दरम्यान मोनोरेल अचानक थांबली आणि तांत्रिक बिघाडामुळे गाडीच्या डब्यांतील लाईट व एअर कंडिशनिंग बंद झाले. परिणामी प्रवासी जवळपास दोन तास डब्यांतच अडकून पडले होते.
या घटनेनंतर डब्यांमध्ये अंधार पसरला आणि उष्णता व घुसमट वाढली. काही प्रवाशांनी मदतीसाठी फोनच्या टॉर्चने संकेत दिले, तर काहींनी खिडक्यांवर ठोके मारून बाहेरील लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.जेणेकरून बाहेरच्या नागरिकाना आपण दिसू आणि हळू हळू प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं, तर काहींना वाटत होत की यातून आपण बाहेर पडणार की इथेच जीव जाणार या भीतीनेच प्रवाश्यांना श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे अस्वस्थता जाणवली.
सूत्रांच्या माहितीनुसार, पावसामुळे आधीच अडचणी निर्माण झाल्या होत्या, आणि त्यात गाडीत नेहमीपेक्षा जास्त प्रवासी असल्याने वजन ठराविक क्षमतेपेक्षा अधिक झालं. त्याचा परिणाम म्हणून वीजपुरवठा खंडित झाला आणि गाडी अडकली.
पण घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशामक दल आणि मोनोरेल प्रशासनाने तत्काळ बचावकार्य सुरू केले. क्रेनच्या मदतीने हळूहळू गाडीपर्यंत पोहोचून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. आणि पहिल्याच रॅकमधून सुमारे ५८० प्रवासी, तर दुसऱ्या रॅकमधून सुमारे २०० प्रवासी बाहेर काढण्यात आले. काहींना घुसमट व भीतीमुळे तब्येतीचा त्रास झाला असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र प्रवाशांचा ताणतणाव आणि त्रास प्रचंड वाढला. घटनेनंतर बऱ्याच प्रवाश्यांनी आपलं आपलं मत रडतांना व्यक्त केलं की यापुढे मोनोरेल मध्ये अजिबात बसणार नाही किंवा बसायचं नाही कायमच राम राम म्हणून प्रवासी काही प्रवासी संतापले महाराष्ट्र सरकारने तातडीने चौकशीचे आदेश दिले असून अशा प्रकारच्या तांत्रिक बिघाडांना जबाबदार कोण, याचा शोध घेतला जात आहे.
या प्रकरणामुळे मुंबईतील मोनोरेलच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. प्रवाशांनी प्रशासनाकडे “दररोजच्या प्रवासात आम्हाला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो का?” असा सवाल केला आहे.

0 Comments