"People’s voice echoed strongly in Kurkheda – MLA Ramdas Masram’s public meeting received an enthusiastic response."
कुरखेडा २८ ऑगस्ट
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या पुढाकाराने कुरखेडा येथे प्रथमच आयोजित केलेला जनता दरबार ऐतिहासिक ठरला. किसान मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
आरमोरी मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच सुरू केलेल्या या उपक्रमामुळे सामान्य नागरिकांना त्यांच्या अडचणी थेट मांडण्याची संधी मिळाली. ग्रामीण व शहरी भागातून आलेल्या शेकडो नागरिकांनी पाणीटंचाई, अपुरा वीजपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सेवांची कमतरता, शैक्षणिक अडचणी, शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात होणारा विलंब, महसूल व इतर विभागातील प्रलंबित प्रकरणे अशा गंभीर समस्या मांडल्या
प्रत्येक तक्रार गंभीरतेने ऐकत आमदार मसराम यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या –
“जनतेच्या प्रश्नांवर तातडीने आणि परिणामकारक तोडगा काढल्याशिवाय पर्याय नाही!”
या ठाम भूमिकेमुळे सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला. विशेष म्हणजे, काही प्रकरणांची जागेवरच दखल घेऊन तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली.
या जनता दरबारामुळे नागरिकांमध्ये समाधान, दिलासा आणि नव्या विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा उपक्रम मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिणारा ठरला, अशी सर्वत्र चर्चा रंगली आहे.
या वेळी उपस्थित, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जीवन पाटील नाट, तशीलदार धनबाते, माजी सभापती परसरामजी टिकले, जयंत हरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, नंदू नरोटे, माजी सभापती गिरीधर तीतराम, श्रीराम दुगा, अविनाश काळे सागर वाढई उपस्थित होते







0 Comments