MLA Ramdas Masram inspects Tribal Government Hostel at Kotgul: several issues exposed
कोटगुल येथील आदिवासी शासकीय वस्तीगृहाला आमदार रामदास मसराम यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान वस्तीगृहातील गंभीर समस्या उघड झाल्या असून विद्यार्थ्यांच्या राहणीमानाबाबतची परिस्थिती चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले.
पाहणीत बेडची दुरावस्था, छत गळती, परिसरातील अस्वच्छता, बाथरूमला दरवाजे नसणे तसेच खोल्यांना रंगरंगोटी न केलेली अशा अनेक समस्यांची नोंद
झाली. या समस्या केवळ वस्तीगृहाच्या देखभालीतील निष्काळजीपणाचाच पुरावा नाहीत, तर विद्यार्थ्यांना आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही दिसून आले.
झाली. या समस्या केवळ वस्तीगृहाच्या देखभालीतील निष्काळजीपणाचाच पुरावा नाहीत, तर विद्यार्थ्यांना आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही दिसून आले.
या परिस्थितीवर आमदार मसराम यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सर्व समस्यांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने लक्ष घालून दुरुस्तीसाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या. विद्यार्थ्यांच्या हितासाठी कोणतीही तडजोड होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आमदारांनी यावेळी घेतली.
“विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह म्हणजे दुसरे घर असते. मात्र, येथे पाहिल्यावर समजले की देखभाल अभावामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. ही स्थिती बदलण्यासाठी तातडीने कार्यवाही आवश्यक आहे,” असे आमदार मसराम यांनी सांगितले.
वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीही अनेकवेळा समस्या मांडल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचेही समोर आले आहे. या भेटीनंतर आता संबंधित प्रशासन खरोखरच पावले उचलते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कोरची मनोजभाऊ अग्रवाल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जीवन पाटील नाट, जिल्हा परिषद सदस्य रामसुराम काटेंगे, सागर वाढई, वाशिम शेख, कमलेश बारस्कर,माजी सभापती श्रावण मातलाम, काँग्रेस जिल्हा महासचिव तथा उपसरपंच परमेश्वर लोहांबरे, झुलपिकार खेतानी, आविका सो कोटगुल अध्यक्ष रामलाल कोरेटी, उपसरपंच कोसमी नं 02 अंतराम टेंभुर्णे,दानसुर हलामी,रमेश मडकाम,रामसाय कुंभरे, श्यामलाल नूरुटी, नारायण धावळे, सहादेव नैताम, सूर्यप्रताप मडावी,

.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
0 Comments