— "Mrs. India winner Manisha Madavi honored with the ‘Empowered Tribal Woman’ Award"
गडचिरोलीच्या लेकीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव;"आदिवासी परंपरेच्या प्रसारात आणि समाज जागृतीत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका"
गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनाचे साधून गडचिरोलीच्या राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी यांना ‘सक्षम आदिवासी महिला’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हा सन्मान आदिवासी विकास मंत्री ना. अशोक ऊईके यांच्या हस्ते कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर येथे आयोजित ‘विरांगणा राणी दुर्गावती महिला सबलीकरण सक्षमिकीकरण मेळावा’ या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
मनीषा मडावी यांनी आतापर्यंत अनेक पुरस्कार पटकावले आहेत. यामध्ये मिस इंडिया २०२१, मिसेस महाराष्ट्र २०२२, सुपर मॉडेल रवी वॉक टायटल ऑफ इंडिया २०२२, फिनिक्स पुरस्कार २०२३, आदिवासी महिला नवरत्न पुरस्कार, मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण पुरस्कार, गडचिरोली गौरव पुरस्कार २०२१ आणि आदिवासी समाज भूषण पुरस्कार २०२२ यांचा समावेश आहे. त्यांनी अत्यंत कमी वयात आपल्या कर्तृत्वाने हे यश मिळवले आहे.
आदिवासी समाजाची संस्कृती आणि परंपरा जगासमोर यावी यासाठी मनीषा मडावी यांनी ‘कोया किंग’ आणि ‘कोया क्वीन’ या स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यांच्या या कार्याची राष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली. याच कार्याची दखल घेऊन आदिवासी विकास विभागाने त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले. यामुळे इतर महिलांनाही प्रेरणा मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
या सन्मानाबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, राहुल झोडे, प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास, राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्षा पौर्णिमा विश्वास, विदर्भ कार्यकारी अध्यक्ष नेताजी सोदोंरकर, विदर्भ अध्यक्ष जावेद सय्यद, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा सचिव प्रकाश थुल, जिल्हा उपाध्यक्ष नानु उपाध्ये, बाळू माडुरवार, तालुका अध्यक्ष कालिदास बन्सोड, भीमराव वनकर, तालुका अध्यक्षा रुपाली कावळे, विशाल सिन्ना यांनी राज्य सरकारचे आभार मानले तसेच, मनीषा मडावी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या आहेत.
Manisha Madavi honored with ‘Empowered Tribal Women’ Award





0 Comments