"आरमोरी तालुका काँग्रेस कमेटीकडून "वोट चोरी" विरोधात स्वाक्षरी अभियानाला सुरुवात.

"Armori Taluka Congress Committee begins signature campaign against electoral fraud."


नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते शुभारंभ 

आरमोरी-  लोकशाहीच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी, आरमोरी तालुका काँग्रेस कमेटीने वोट चोरी या गंभीर विषयावर स्वाक्षरी अभियानाचे आयोजन केले. या उपक्रमांचे शुभारंभ गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी


अभियानाच्या दरम्यान काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदारांशी संवाद साधून त्यांना “वोट चोरी” चे लोकशाहीवर होणारे परिणाम समजावून सांगितले. स्वच्छ आणि प्रामाणिक निवडणुका घडवून आणण्यासाठी अशा प्रकारची जनजागृती आवश्यक असल्याचे  सांगितले.

या अभियानात महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्साहपूर्ण सहभाग होता. अनेकांनी स्वतःहून येऊन स्वाक्षरी करत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. काँग्रेस कमेटीच्या नेत्यांनी निवडणूक आयोग व संबंधित यंत्रणांकडे हे स्वाक्षरी पत्र पाठवून कारवाईची मागणी करण्याचा निर्धार करुण वोट चोरी हा लोकशाहीला लागलेला कलंक आहे, तो दूर करण्यासाठी प्रत्येक मतदाराने जागरूक राहणे गरजेचे आहे,” असे मत जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केले.

निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या काळात झालेल्या कथित वोट चोरीबाबत काँग्रेस पक्ष आणि सर्वसामान्य जनते कडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आरमोरी तालुक्यातील गावागावात वोट चोरीविरोधात स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार आहे.असेही बोलले 

या अभियानांतर्गत प्रत्येक गावात जाऊन नागरिकांकडून स्वाक्षऱ्या घेतल्या जाणार आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण यासाठी जागरूक करणे आहे.

 भविष्यात अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी काँग्रेस पक्ष व्यापक चळवळ उभारण्याच्या तयारीत आहे. असे तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, तालुका अध्यक्ष मिलींद एम. खोब्रागडे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम,शहर अध्यक्ष शालिक पत्रे, विजय सुपारे, योगेश चापले, अमीन भाई शेख, अनिल किरमे, अशोक हारगुळे, कुमेश धूपजारे, बंडूभाऊ खोडवे, मुरलीधरजी राऊत, काशिनाथ पात्रीकर,अनुज खोसे,रामदास दोनाडकर,

बाबुराव माकडे, हेमराज प्रधान, टीकाराम प्रधान, विष्णू दुमाने, कृष्णादास गरमळे, मनोज बोरकर, संगीता मेश्राम,यक्षकला ठवरे, आशुतोष भरणे, राजूभाऊ सामृतवार, चंद्रशेखर टेंभुर्ण, रमेश धोंडरे, विजय मडावी, सुशील जुमनाके, रामदास हारगुडे, संकेत पाथर,उपरून ढोरे, भीमराव बारसाकडे, संजय लोणारे, रवी डोकरे, नीलकंठ गोहने, अशोक शामकुळे, टी. एम. खोब्रागडे, रामदास भांडे, नामदेव मेश्राम, स्वप्निल ताडाम, मुस्ताक शेख, प्रतीक भुरसे,  अजय मेश्राम, आकाश लोटे, अंशिक लोणारे, सिकंदर नंदरधने, चरणदास दोनाडकर,  प्रल्हाद राऊत, अंकुश गाढवे , जिया पनव.यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments