"MLA Ramdas Masram supports the indefinite strike of contractual teachers – demands immediate release of honorarium."
गडचिरोली – कंत्राटी शिक्षकांचे मानधन गेल्या काही महिन्यांपासून स्थगित असल्याने शिक्षक वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.
आपल्या मागण्यांसाठी कंत्राटी शिक्षकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी भेट देऊन शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेतले.
यानंतर आमदार मसराम यांनी जिल्हा परिषद गडचिरोली येथे अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
या निवेदनातून शिक्षकांचे थकीत मानधन तातडीने वितरीत करावे आणि कंत्राटी शिक्षकांच्या इतर मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
या वेळी आमदार मसराम म्हणाले की –
“शिक्षक समाजाचे शिल्पकार आहेत. त्यांनाच मानधनापासून वंचित ठेवणे ही अन्यायकारक बाब आहे. शासनाने त्वरित निर्णय घेऊन शिक्षकांच्या कुटुंबांवरील आर्थिक संकट दूर करणे गरजेचे आहे.”






0 Comments