"देसाईगंज तहसील कार्यालयात “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” कार्यक्रमाचे आयोजन"

“Organization of the ‘Rashtraneta to Rashtrapita Service Fortnight’ program at Desaiganj Tehsil Office”

देसाईगंज : छत्रपती शिवाजी महाराज महाराजत्व अभियानांतर्गत “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” या विशेष उपक्रमाचा शुभारंभ देसाईगंज तहसील कार्यालयात मोठ्या उत्साहात करण्यात आला. हा कार्यक्रम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

या प्रसंगी आमदार रामदास मसराम, धनपाल मिसार सर, तहसीलदार प्रीतीताई डुडूलकर मॅडम , नायब तहसीलदार कुंभरे साहेब, नायब तहसीलदार धात्रक मॅडम,नायब तहसीलदार बोके मॅडम,पुरवठा निरीक्षक युवराज बोरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत विविध शासकीय सेवा जनतेपर्यंत पोहोचविण्याबरोबरच, सामाजिक जनजागृती व लोकसहभाग यावर भर देण्यात येणार आहे. पाण्याचे सर्वेक्षण मोहीम, शालेय प्रमाणपत्र वाटप, स्वतःची घरे नसलेल्या पात्र महिलांच्या नावे सातबारा, लक्ष्मीबाई अभियानांतर्गत विविध उपक्रम यांचा समावेश या सेवा पंधरवड्यात करण्यात आला आहे.

या उपक्रमाचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा गांधी यांच्या कार्यप्रेरणेप्रमाणे लोकाभिमुख प्रशासन घडविणे हा आहे. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



Post a Comment

0 Comments