"Dr. Ashish Dada Koreti met the Chief Minister"
गडचिरोली जिल्ह्यातील समस्या व आदिवासी-ओबीसी समाजाच्या मागण्या मांडल्या.
मुंबई : दिनांक १८ सप्टेंबर रोजी डॉ. आशिष दादा कोरेटी यांनी मुख्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्या तसेच आदिवासी आणि ओबीसी समाजाच्या गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे तसेच महामार्ग बांधकामांमुळे निर्माण झालेल्या अडचणींचे त्वरित निराकरण करण्याची मागणी करण्यात आली. धनगर, बंजारा आदी तत्सम जातींना आदिवासी (ST) प्रवर्गात समाविष्ट करू नये, असा ठाम आग्रहही नोंदविण्यात आला.
परतीच्या पावसामुळे गडचिरोली आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी डॉ. कोरेटी यांनी केली.
लहान संवर्गातील मागासवर्गीयांच्या आरक्षित पदांबाबत शासन निर्णय (६ मार्च २०२४) नुसार अनुसूचित जमातीच्या बिंदू नामावलीत त्वरित दुरुस्ती करून आदिवासी युवकांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सधन मराठा समाजाला ओबीसी कुणबी प्रवर्गात समाविष्ट करू नये, असेही नमूद करण्यात आले.
महाराष्ट्रात आदिवासी संवर्गातील रिक्त १२,५०० पदे तातडीने भरून आदिवासी युवकांसाठी एम्प्लॉयमेंट ड्राइव्ह आयोजित करावा तसेच जिल्ह्यातील १७ संवर्गातील पेसा कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
या वेळी माननीय मुख्यमंत्री महोदयाना निवेदन देताना मायाताई इवनाते (मा सदस्या अनुसूचित जनजाति आयोग, नवी दिल्ली तथा माजी महापौर मनपा नागपुर), शिवकुमार कोकोड़े (अध्यक्ष आविस), संजय गावडे (कार्याध्यक्ष, सरपंच संघटना) वेदांत उईके, सारंग जांभुळे, अंकुश गाढवे, श्रीकांत आतला, नीलकंठ गोहने आणि कार्यकर्ते उपस्थित होते
डॉ. आशिषदादा कोरेटी
संस्थापक- वन-जन-हक्क (वजह) फाउंडेशन
उपाध्यक्ष- विदर्भ ट्राइबल डॉक्टर्स असोसीएशन
माजी उपाध्यक्ष व कोषाध्यक्ष- आदिवासी विद्यार्थी संघ
(विदर्भ- नागपुर)

0 Comments