आता वाढत्या महागाई मुळे महाराष्ट्रातील जनता संतापले आहेत.
या भाडेवाढीला महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाने अधिकृत मान्यता दिली आहे, ज्यामध्ये 14.95 टक्के समायोजन करण्यात आले आहे.
हे नवीन दर 25 जानेवारीपासून लागू करण्यात आले असून, त्यामुळे प्रवाशांना राज्यातील (MSRTC bus) बस प्रवासासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार आहे.
एकीकडे लाडकी बहिणीचे पैसे काढायचे दुसरीकडे त्याच्या दुप्पट टॅक्स द्यायचे महागाई चे पैसे द्यायचे हा आहे या सरकारच खर रूप जो आतापर्यंत मतदारांना दिसत नाही आणि दिसणार सुद्धा पण असो
महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis सरकारच्या मंजुरीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
MSRTC द्वारे पुरविल्या जाणाऱ्या बस सेवांचा दर्जा राखण्यासाठी भाड्यातील समायोजन करण्यात आले आहे. या घोषणेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे, ज्यामुळे राज्यातील रहिवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीच्या खर्चात लक्षणीय बदल झाले आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या (MSRTC fare) एका अधिकाऱ्याने आणि प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियानेही भाडेवाढीला (MSRTC fare) महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिल्याची पुष्टी केली.
राज्यातील रहिवासी आधीच महागाईचा सामना करत असताना MSRTC बसेसमध्ये सुमारे 15 टक्क्यांची भाडेवाढ करण्यात आली आहे. दररोज 55 लाख प्रवासी प्रवास करतात. महाराष्ट्राची गणना देशातील मोठ्या राज्यांमध्ये होते. आणि महाराष्ट्र रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ही देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक वाहतूक कंपन्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे सुमारे 15 हजार (MSRTC bus) बसेस आहेत. यामध्ये, दररोज सुमारे 55 लाख लोक राज्यभर प्रवास करतात.
ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे वाढणार का?
हा जनतेसमोर एक मोठा प्रश्न निर्माण झालं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महानगरात 1 फेब्रुवारीपासून ऑटो रिक्षा (Auto-taxi) आणि टॅक्सीचे भाडेही वाढणार आहे. आणि संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की टॅक्सी आणि ऑटोच्या भाड्यात 3 रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र मोटार वाहन विभागाने (Motor Vehicles Department)
जारी केलेल्या माहितीनुसार, भाडे वाढवण्याचा निर्णय 23 जानेवारी रोजी झालेल्या एसटीएम बैठकीत घेण्यात आला आहे.
दिवसेंदिवस असेच जर महागाई वाढत जाईल तर आणि भारताची आर्थिक व्यवस्था वाढण्याच्या नादात सामान्य माणूस बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही. सरकारचे धोरण जरी लोकांच कल्याण करायचं उद्देश असेल तरी पण गरीब जनता अजूनही दारिद्र्य रेषेखालीच कारण म्हणजे महागाई.
अश्याच प्रकारच्या नवनवीन बातम्या रोजगार संदर्भात शेती संबधात सरकारी माहिती बद्दल विस्तृतपणे माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ( सरकारी माहीत गड ) या संकेतस्थळ वर व्हिजिट करा......धन्यवाद
खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून आमच्या सरकारी माहिती नावाच्या Whatsapp ग्रुप ला पण जॉईन होऊ शकता
https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO
0 Comments