"सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना, सबसे कातील गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी घेते तब्बल एवढ्या लाखोंचं मानधन"

"Famous Lavani dancer, the most glamorous Gautami Patil, charges lakhs of rupees for a single performance." 


"Gautami Patil is no longer merely a dancer; she has risen to become a brand in her own right."

महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे डान्सर गौतमी पाटील. तिच्या लावणी आणि स्टेज शोमुळे तरुणाई वेडी झाली आहे. 

गावोगावी, जत्रांमध्ये, खासगी कार्यक्रमांत तिच्या शोला प्रचंड गर्दी उसळते. पण या लोकप्रियतेसोबतच लोकांच्या मनात एक प्रश्न कायम आहे—गौतमी पाटील एका शोसाठी किती फीस घेते? 

एका कार्यक्रमाची किंमत लाखोंच्या घरामध्ये

सूत्रांच्या माहितीनुसार आणि विविध माध्यमांच्या रिपोर्टनुसार, गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी सुमारे ₹1.5 लाख ते ₹2 लाख इतकी रक्कम घेते. ही फीस आयोजकांना तिच्या टीमसह द्यावी लागते. यामध्ये तंत्रज्ञ, बँड, स्टेज मॅनेजमेंट अशा गोष्टींचाही खर्च समाविष्ट असतो. 

गौतमी पाटील ची महिन्याची कमाई

गौतमी पाटील महिन्याला तब्बल ३० ते ३५ लाख रुपये सहज कमावते, असा अंदाज व्यक्त केला जातो. कारण तिच्या शोला नेहमीच तुफान मागणी असते. महाराष्ट्रासह राज्याबाहेरूनही आयोजक तिच्या परफॉर्मन्ससाठी संपर्क साधत असतात. 

अफाट लोकप्रियता 

गौतमीच्या शोमुळे होणारी गर्दी सांभाळण्यासाठी अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्ताची मदत घ्यावी लागते. काही वेळा यासाठी आयोजकांवर अतिरिक्त खर्चाचा भारही पडतो. तरीदेखील प्रेक्षकांचा ओघ आणि तिची लोकप्रियता यामुळे शो रद्द करणं आयोजकांना परवडत नाही. 

गौतमी पाटील ही केवळ एक डान्सर राहिलेली नाही, तर एक ब्रँड बनली आहे. तिच्या डान्सचा जलवा आणि चाहत्यांचा उत्साह यामुळेच तिच्या शोची किंमत थेट लाखोंमध्ये गेली आहे. आजच्या घडीला महाराष्ट्रात सर्वाधिक फीस घेणाऱ्या कलाकारांपैकी ती एक ठरली आहे.

Post a Comment

0 Comments