"समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेणाऱ्या वीर लढाऊ नेत्याला अखेरचा जयभीम"

"Salute to the Brave and Fearless Leader Who Devoted His Life to Society – Final Jai Bhim"


अखेरचा जयभिम...

शहीद विनोद पवार यांचा मृतदेह 30 तासानंतर सापडला. विनोद पवारांची प्रशासनिक हत्या झालेली आहे. जिल्हाधिकारी पासुन सर्व जबाबदार अधिकारीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

पीडित कुटुंबाला 1 कोटीची शासकीय मदत करा. कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी द्या!

साथीयो, मला पोहायला येत नाही, पण बलिदान देणं गरजेचं आहे म्हणत उडी घेतलेला हा आंदोलक शहीद झालं आहे. 

राज्य सरकारने आंदोलकांना गांभीर्याने घ्यावं, त्यांच्या मागण्याना नीट हाताळावा.

BRSP बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील लढाऊ नेत्याला अखेरचा जयभीम!

शहीद विनोद पवारच्या जाण्याने चळवळीची मोठी हानी झालेली आहे. राज्यातील समाज बांधवानी विनोदच्या कुटुंबाला मदत करावी!

संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी वाहून घेतलं होतं. आयुष्यभर मिशन मोव्हमेन्ट सांगत, लढत लढत इथपर्यंत आला. त्यांच्या त्यागाला सलाम!

संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी वाहून घेतलं होतं. आयुष्यभर मिशन मोव्हमेन्ट सांगत, लढत लढत इथपर्यंत आला. त्यांच्या त्यागाला सलाम! 

आज विनोद पवार शारीरिकरित्या आपल्यात नाहीत… हा विचार जरी डोळ्यांसमोर आणला तरी अंत:करण हेलावून जातं.

एक जिवंत ज्योत, एक प्रेरणादायी आवाज, एक निडर लढवय्या आज कायमचा शांत झाला आहे.

पण त्यांचं स्वप्न, त्यांचं धाडस, त्याग आणि लढ्याची परंपरा कधीही शांत होऊ शकत नाही. 

त्यांनी आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून चळवळीला जीवन दिलं.

त्यांनी दाखवून दिलं की अन्यायाविरोधात लढा देणं म्हणजे फक्त घोषणा नव्हे, तर आपल्या श्वासापेक्षाही महत्त्वाचं ध्येय आहे.

आज त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यांतून वाहणारा अश्रू हा आपल्यासर्वांच्या मनातील वेदना आहे, आणि तोच अश्रू पुढील लढ्याचं इंधन ठरणार आहे.

विनोद पवार हे नाव आता एका व्यक्तीपुरतं मर्यादित राहणार नाही – ते बलिदानाचं प्रतीक आहे, ते चळवळीच्या नव्या इतिहासाचं पान आहे.

जो आता त्यांच्या जाण्याने निर्माण झालेलं पोकळपण कधीही भरून निघणार नाही, पण त्यांच्या स्मृती आपल्या प्रत्येक पावलाला दिशा देतील. 

शहीद कधी मरत नाहीत – ते लोकांच्या हृदयात, लढ्याच्या घोषणांमध्ये आणि अन्यायाविरोधातील प्रत्येक आवाजात अमर राहतात. 

चला, आपण सारे त्यांच्या स्वप्नांना साकार करण्याची शपथ घेऊया,

त्यांच्या अपूर्ण लढ्याला आपल्या जीवाची बाजी लावून पूर्ण करूया. 

आज शहीद विनोद पवारांस अखेरचा जयभीम देताना… हृदय रक्तबंबाळ होतंय… पण त्याच वेदनेतून नवा लढा उभा राहील…! 🌹


Post a Comment

0 Comments